विजापूरमधील गणेश नगरजवळील रेल्वे रुळावर एका व्यक्तीने चालत्या रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
गदगी लेआऊट येथील रहिवासी गुरुराज पुरोहित (वय 45) यांनी आत्महत्या केली. मुंबई-गदग ट्रेनखाली डोके ठेवून त्याने मृत्यूला कवटाळले. रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. याप्रकरणी रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Recent Comments