बेळगाव येथील केएलई हॉस्पिटलमध्ये 11, 12 आणि 13 नोव्हेंबर असे तीन दिवस कर्नाटक विभागाच्या त्वचाविज्ञान संस्थेतर्फे 13 वी आयएडीबीएल राज्यस्तरीय परिषद आयोजित करण्यात आली असून आज तिचे उदघाटन झाले.

13 वी 3 दिवसीय आयएडीबीएल राज्यस्तरीय परिषद डॉ. व्ही. डी. पाटील हॉल, केएलई हॉस्पिटल, बेळगाव येथे आयोजित करण्यात आली आहे. यासंदर्भात आयएडीबीएलचे प्रदेशाध्यक्ष डॉ. रवी राठोड यांनी आज पत्रकार परिषदेत माहिती दिली. ते म्हणाले की, आज आमची एक दिवसीय परिषद सुरु झाली आहे. शनिवारी आणि रविवारी चर्चा आणि प्रबंध सादरीकरण करण्यात येईल. यामुळे रुग्णांच्या उपचारांची पातळी सुधारण्यास मदत होणार आहे. आम्ही रुग्णांना चांगले औषध-उपचार देऊन बरे करण्याचा प्रयत्न करतो. त्वचारोग, केस, नखे असा त्रास असल्यास संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. अन्यथा, त्यामुळे होणारे नुकसान अपार आहे. त्यामुळे तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास योग्य मार्गदर्शन व उपचार उपलब्ध होतील. या परिषदेत राज्यातील आणि बाहेरील राज्यातील 550 जण सहभागी झाले असल्याची माहिती त्यांनी दिली.

पत्रकार परिषदेला आयएडीबीएलचे राज्य सचिव डॉ. जयंत, डॉ. संतोष शिंदे आदी उपस्थित होते.


Recent Comments