Belagavi

नागरिकांच्या समस्या निवारण्यासाठी एसपी साधणार फोनवरून संवाद!

Share

बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजीव पाटील हे फोनच्या माध्यमातून बेळगावकरांशी संवाद साधणार आहेत. आपण ज्या ठिकाणी आहोत, त्या ठिकाणावरून पोलीस अधीक्षकांशी संवाद साधून आपल्या अडचणी सांगता येणार आहेत. ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी १ यावेळेत बेळगावकरांशी ते संवाद साधणार आहेत.

आपल्या समस्यांचे निराकरण आता फक्त एका फोन कॉलद्वारे आपण करू शकणार आहोत. आपल्या भागासह इतर कोणत्याही समस्यांबद्दल तुम्ही जिथून आहात तिथून तुम्ही बेळगावच्या एसपींना फोन करून सांगू शकता. यासाठी बेळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. संजीव पाटील यांनी ‘फोन इन’ कार्यक्रमाचे आयोजन केले असून या माध्यमातून –

१) आपली तक्रार पोलीस स्थानकात घेतली नसेल, २) दिलेल्या अर्जाची चौकशी झाली नसेल, ३) आपल्या भागात पोलीस येत नसतील, ४) मटका, जुगार, क्रिकेट सट्टा याबद्दलची माहिती, ५) अवैध दारूविक्री ६) शाळा-महाविद्यालयीन मुलींची छेड काढणे, ७) अवैध वाळू उत्खनन, रेशन तांदळाचा बेकायदेशीर साठा आणि इतर तस्करीची माहिती ८) वाहतुकीची समस्या, पार्किंगची समस्या ९) विद्यार्थ्यांसाठी बस व्यवस्थेची कमतरता १०) आठवडी बाजाराविषयी समस्या ११) आपल्या भागात नाहक आवाजामुळे त्रास देणाऱ्यांविषयी तक्रार १२) एक्सपायरी डेटच्या पुढे व्यवसाय करणाऱ्या मद्यविक्री दुकानाबद्दल माहिती १३) किराणा दुकान आणि इतर दुकानांमध्ये अवैध दारू विक्री १४) शाळा आणि महाविद्यालयांजवळ सिगारेट, विडी आणि इतर तंबाखूजन्य पदार्थांची विक्री १५) मुला/मुलींचा बालकामगार म्हणून वापर करणाऱ्यांची तक्रार १६) बालविवाहाची माहिती १७) रस्त्यांवर वारंवार रस्ते अपघात होत असल्याची माहिती १८) उघडी कूपनलिका

१९) असुरक्षित वीजवाहिन्या २०) गांजा विक्री, सेवन आणि लागवड याबाबतची माहिती आपण अधीक्षकांना फोनच्या माध्यमातून कळवू शकता.या तऱ्हेच्या आणि याशिवाय इतर कोणत्याही समस्यांबद्दल आपण फोनद्वारे माहिती देऊ शकता. माहिती देणाऱ्याचे नाव, मोबाईल नंबर गोपनीय ठेवण्यात येईल, तसेच खोटी माहिती देणाऱ्यावर कारवाई केली जाईल. यामध्ये महिला, मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग घेऊन आपले विचार आणि सूचना मांडाव्यात. आपल्या सूचना, समस्या मांडण्यासाठी ०८३१ – २४०५२०४ या क्रमांकावर ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी १ पर्यंत आपण फोन करू शकता. तसेच आपल्या अधिकारक्षेत्रात पोलीस स्थानकात उत्तम कामगिरी आणि चोख कर्तव्य पार पाडणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची माहिती देखील देण्याचे आवाहन पोलीस विभागातर्फे करण्यात आले आहे.

Tags:

dr-sanjeev-patil-phone-in-program-on-12th-november/