Belagavi

बेळगावात मठाधीशांचे चिंतन संमेलन; प्रभाकर कोरे यांचा सत्कार

Share

लिंगायत मठाधीशांचे चिंतन संमेलन आज बेळगावात मोठ्या दिमाखात पार पडले. यावेळी अमृत महोत्सवानिमित्त केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांचा ह्रुद्य सत्कार समारंभ पार पडला.

बेळगाव येथील शिवबसव नगर येथील नागनूर रुद्राक्षी मठाच्या आर.एन.शेट्टी पॉलिटेक्निक कॉलेजच्या प्रांगणात आज शुक्रवारी ‘शिक्षण संस्था आणि मठाधीश’ या विषयावर लिंगायत मठाधीशांचे चिंतन संमेलन पार पडले. या अनुषंगाने शिक्षण संस्था आणि मठाधीशांच्या वतीने डॉ. प्रभाकर कोरे यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त अभिनंदन व सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत शंभरहून अधिक विविध मठांचे मठाधीश, स्वामीजी सहभागी झाले होते. सत्तूर मठाचे जगद्गुरु शिवरात्री देशिकेंद्र महास्वामीजी, सिरीगेरे तरळबाळू महासंस्थान मठाचे जगद्गुरु डॉ. शिवमूर्ती शिवाचार्य महास्वामी, गदग तोंटदार्य मठाचे डॉ. तोंटद सिद्धराम महास्वामीजी, हुबळी मुरसावीर मठाचे जगद्गुरु डॉ. गुरुसिद्ध राजयोगींद्र महास्वामी, मुंडरगी अन्नदानेश्वर संस्थानमठाचे जगद्गुरू नाडोज डॉ. अन्नदानेश्वर महास्वामी, निडसोशी मठाचे पंचमशिवलिंगेश्वर महास्वामी यांच्यासह इतर स्वामीजी व मान्यवरांनी सहभाग घेऊन कार्यक्रमाचे उदघाटन केले.

यावेळी बीजभाषण देताना ज्येष्ठ साहित्यिक डॉ. गो. रु. चन्नबसप्पा म्हणाले की, शैक्षणिक संस्था आणि मठ या दोन्हींचा अर्थ एकच आहे. भक्तांनी गुरूंचा आदर करण्याची प्रथा आहे. मात्र, येथे गुरूंनीच स्वतः भक्ताचा आदर केला आहे हे विशेष. यांच्याहस्ते आज प्रभाकर कोरे यांचा सन्मान होत असून त्यांनी चांगले सामाजिक कार्य केले त्याची ही पावती आहे. सध्याच्या जीवनात आज आपण एकमेकांच्या विरोधात होणारी विकृत समाजबांधणी, दु:ख आणि संकटे पाहत आहोत. आपण अंधार बाहेर काढू शकत नाही, त्याला प्रकाशाची गरज आहे. अंधार आणि प्रकाश यांच्यातील संघर्षाची गरज नाही असे ते म्हणाले.

प्रभाकर कोरे हे केवळ बेळगावचे नाहीत. त्यांची समाजसेवा आज देशभर पसरली आहे. केएलई संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर कोरे, ज्यांनी स्वत:ला लोकसेवेत झोकून दिले आहे, त्यांनी अनेक संस्था बांधल्या आणि विकसित केल्या. शांतपणे सेवाकार्य करणाऱ्या प्रभाकर कोरे यांचे सामाजिक जीवन आणि शिक्षण व्यवस्थेत मोलाचे योगदान असल्याचे कौतुक गो. रु. चन्नबसप्पा यांनी केले.

सिरीगेरे तरळबाळू महासंस्थान मठाचे जगद्दुरू डॉ. शिवमूर्ती शिवाचार्य महास्वामी यांनी, डॉ. प्रभाकर कोरे हे केवळ दिग्गज नेते नाहीत, तर असामान्य धैर्य असलेले समाजाभिमुख नेते आहेत अशी स्तुती केली. डॉ. प्रभाकर कोरे यांनी अप्रतिम कार्य केले आहे. त्यांची सेवा सदैव संस्मरणीय आहे. त्यांना शतायुषी व्हा म्हणत आपण का मनाचा कद्रूपणा का दाखवायचा? उलट ते शेकडो वर्षे जगण्याची इच्छा करूया. आमच्या आणि त्यांच्या वयात फारसा फरक नाही. माझ्या जन्मानंतर दोन महिन्यांनी कोरेंचा जन्म झाला. माझा जन्म शिमोगा येथील गावात झाला, तर कोरे यांचा जन्म बेळगावातील अंकली येथे झाला. अल्लमप्रभूंनी म्हटल्याप्रमाणे डोंगरातील आवळा आणि समुद्रातील मीठ यांचा संबंध आहे, आपण जिथे जन्मलो आणि वाढलो तिथे समाजसेवा करण्याची आपल्या सर्वांची इच्छा समान आहे. कोरे यांनी एवढे मोठे काम केल्याचे त्यांनी कौतुक केले.

शिक्षण आणि सुविधा कोणत्याही विशिष्ट जाती किंवा वर्गापुरत्या मर्यादित नाहीत. आपल्या मठ-मंदिरांनी आणि आपल्या संस्थांनी धर्माचा विचार न करता सर्वांना समान संधी दिली आहे, याचा अभिमान वाटतो असे सुत्तूर मठाचे जगद्गुरु शिवरात्री देशिकेंद्र महास्वामी यांनी याप्रसंगी सांगितले. काही संस्था अशा आहेत की ज्यांचा आज सर्वांकडून एकप्रकारे तिरस्कार होत आहे, याचे आपण आत्मपरीक्षण केले पाहिजे असे, गो. रु. चन्नाबसप्पा यांनी येथे नमूद केले आहे. मुलांना चांगले शिक्षण दिले पाहिजे. ते शिक्षण व्यवसायाभिमुख आणि वस्तुनिष्ठ असावे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या मुलांना नैतिक शिक्षण अधिक समर्पकरित्या देण्याची नितांत गरज आहे. अशा संस्थेत शिकणारी मुले एका नैतिक शक्तीचे वारसदार, आपल्या समाजातील आणि देशाचे राजदूत बनतात, हे या संस्थांचे देशासाठी अनन्यसाधारण योगदान आहे, याचे त्यांनी कौतुक केले.

समाजात होत असलेल्या बदलांशी जुळवून घेत चांगले शिक्षण देण्याचे काम धार्मिक संस्था, संघटना करत आहेत, ही अतिशय आनंदाची बाब आहे. कोरे यांच्या अमृतमहोत्सवाचा साक्षीदार बनून मला खूप आनंद झाला असे जगद्गुरु शिवरात्री देशिकेंद्र महास्वामी यां…

Tags:

belagavi dr prabhakar kore felicitation by shri