Belagavi

आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याहस्ते सुळेभावीत नवीन बसस्थानकाचे भूमीपूजन

Share

बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील सुळेभावी गावात नवीन बसस्थानकाचे भूमीपूजन आज आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते करण्यात आले.

सुळेभावी गावात 50 लाख रुपयांच्या अनुदानातून नवीन सुसज्ज बसस्थानकाच्या कामाचे शुक्रवारी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.

भूमिपूजनानंतर बोलताना आ. लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या, आई महालक्ष्मी देवीच्या आशीर्वादाने सुळेभावी गावाचा विकास झपाट्याने होत आहे. येथे सुसज्ज बसस्थानक असावे हे गावातील ज्येष्ठांचे स्वप्न होते. ते आता पूर्ण झाले आहे. देवी महालक्ष्मीचे दर्शन घेण्यासाठी देशाच्या अनेक भागातून भाविक सुळेभावी येथे येतात. त्यांची सुसज्ज बसस्थानकाअभावी खूप गैरसोय होत होती. यामुळे मी माजी परिवहन मंत्री लक्ष्मण सवदी आणि विद्यमान परिवहन मंत्री श्रीरामुलू यांची भेट घेऊन 5 कोटी अनुदान मागितले, मात्र निधीअभावी त्यांनी 50 लाख दिले. त्यातून आम्ही आज नवीन बसस्थानकाचे भूमिपूजन केल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी बसवराज म्यागोटी, महेश सुग्गेनवरा, मंजुनाथ, मल्लेश, उदय केसरूर, बाळेशी, शेखर होसुरी, बसनगौडा पाटील, देवण्णा बागेन्नवर, संतोष, फकिरा कोलकार, शेखर शिंगी, विठ्ठल बंडीगिनी, इस्माईल तिगडी, कल्लाप्पा कामकर, संभाजी यम्मुचे, विठ्ठल मंडू, नागय्या कुडचीमठ, नागय्या हंपीहोळी, मंजुनाथ पटली, सहाय्यक कार्यकारी अभियंता एन. पी. तिम्मारेड्डी, दिनेश आणि मंजुनाथ तसेच केएसआरटीसीचे अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Tags:

legislator-laxmi-hebbalkar-drive-to-sulebhavi-new-bus-station/