दक्षिण कोंकण संस्थेच्या जीएसएस महाविद्यालयातील विज्ञान शाखेच्या पदवीपूर्व विभागात तीन दिवसीय मेराकी विज्ञान आणि संस्कृती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून बेळगावचे एएसआय आणि महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी धर्मराज शिंदे उपस्थित होते. यावेळी आपल्या भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात काहीतरी ध्येय ठेवले पाहिजे. जर ध्येय बाळगले नाही तर आयुष्यात काहीही साध्य करणे शक्य नसल्याचे मत एएसआय धर्मराज यांनी व्यक्त केले. या महाविद्यालयात मी एक ध्येय समोर ठेवून शिक्षण घेतले आहे, त्यामुळे आज मी पोलीस अधिकारी म्हणून तुमच्यासमोर उभा आहे. शाळा-महाविद्यालयात जे काही शिक्षण मिळेल त्याचा उपयोग वैयक्तिक विकासाबरोबरच, इतरांच्या विकासासाठीही केला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष ए एम खांडेकर, प्राध्यापक प्रणव पित्रे, एस आय प्रभू, एच एस कलघटगी, बिंबा नाडकर्णी, विनायक जाधव, राजश्री पाटील, के व्ही फडके आदींसह अनेक मान्यवर आणि विद्यार्थी उपस्थित होते.


Recent Comments