Vijayapura

विजापुरात “देऊळबंद” : चंद्रग्रहणापूर्वीच विशेष पूजा

Share

या वर्षातील अखेरच्या चंद्रग्रहणानिमित्त आज विजापूर शहरातील मंदिरांमध्ये विशेष पूजा केली जात आहे. ग्रहण सुरु होण्यापूर्वीच पूजा केल्या जात आहेत. त्यानंतर ग्रहणकाळात देऊळबंद राहणार आहेत.

विजापूर शहरातील गोलघुमट रोडवर असलेल्या ऐतिहासिक शिवलिंग असलेल्या मल्लिकार्जुन मंदिरात पूजा, पुण्यसंस्कार होत आहेत. आज दुपारी २ वाजता मंदिरे बंद होतील. ग्रहण स्पर्श काळ सुरु झाल्यापासून ते ग्रहण मोक्ष काळापर्यंत मंदिरे बंद ठेवण्यात येणार आहेत. सिद्धेश्वर मंदिर, सुंदरेश्वर मंदिर, राम मंदिर, शनिमंदिर, ऐतिहासिक मल्लिकार्जुन मंदिर आदी मंदिरे बंद राहणार आहेत. आज चंद्रग्रहण स्पर्शकाळ दुपारी 02.39 प्रारंभ होईल. मध्य वेळ 04.31 वाजता आहे तर सायंकाळी 06.11 वाजता ग्रहण समाप्त होईल.

Tags: