Belagavi

बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या विकासाला अखेर मुहूर्त

Share

बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील विकासकामांना अखेर मुहूर्त मिळाला आहे. रस्ते, गटारी, पेव्हर्स बसविणे आदी विविध कामे आज सुरू करण्यात आली.

होय, उत्तरचे आमदार अनिल बेनके, जिल्हाधिकारी डॉ. नितेश पाटील, बुडा आयुक्त प्रीतम नसलापुर, स्मार्ट सिटीचे व्यवस्थापकीय संचालक प्रवीण बागेवाडी यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील रस्ता, गटार निर्मिती व पेव्हर बसविण्याच्या कामांचे भूमिपूजन केले. जिल्हा पंचायत ते सरदार हायस्कूल क्रॉसपर्यंतच्या रस्त्याच्या दुरुस्ती कामाला चालना देण्यात आली.

येथील खराब झालेल्या रस्त्याबाबत आमच्या इनन्यूज-आपि मराठीने अनेकदा वृत्त प्रसारित केले होते. तसेच अधिकाऱ्यांच्या विरोधात जनतेने संताप व्यक्त केला. सार्वजनिक बांधकाम विभाग, बेळगाव नगर विकास प्राधिकरण आणि स्मार्ट सिटी प्रकल्पात एकूण 2 कोटी 35 लाख रुपयांच्या अनुदानातून कामे हाती घेण्यात आल्याचे आता खडबडून जागे झालेल्या आमदार आणि अधिकाऱ्यांनी सांगितले.

यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक कार्यकारी अभियंता नाईक, ठेकेदार उदय शिवकुमार, किलारी आदी अधिकारी व स्थानिक नागरिक उपस्थित होते. एकंदरीत लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांना जागे करून कामाला सुरुवात केल्याबद्दल जनतेने अभिनंदन केले. दर्जेदार काम लवकरात लवकर पूर्ण होऊन त्याचा फायदा जनतेला व्हावा, ही सर्वांचीच इच्छा आहे.

Tags:

development-of-dc-office-premises/