राज्यातील शैक्षणिक क्रांतीचे प्रणेते डॉ. प्रभाकर कोरे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त नागनूर रुद्राक्षी माठातर्फे ११ नोव्हेंबर रोजी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ यांनी दिली.
नागनूर रुद्राक्षी मठात सोमवारी विविध मठाधीशांच्या उपस्थितीत पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना के एल इ संस्थेचे संचालक आणि माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ म्हणाले, डॉ. प्रभाकर कोरे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त सत्कार समारंभ तसेच शैक्षणिक संस्था आणि मठाधीश या विषयावर विविध मठाधीशांचे भव्य चिंतन शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमास सुत्तुर मठाचे जगद्गुरू शिवरात्री देशिकेंद्र महास्वामी, सिरिगेरे तरळबाळू मठाचे डॉ. शिवमूर्ती शिवाचार्य महास्वामी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. याचप्रमाणे हुबळी मुरूसावीर मठाचे डॉ. गुरुसिद्ध राजयोगीन्द्र महास्वामी, गदग डम्बळचे डॉ. तोंटद सिद्धाराम महास्वामी, मुंडरगी येथील डॉ. अन्नदानेश्वर महास्वामी, निडसोशी पंचमशिवलिंगेश्वर महास्वामी, शिवमोगा आनंदपूरचे डॉ. मल्लिकार्जुन मुरूघ राजेंद्र महास्वामी, कोट्टुरस्वामी मठाचे कोट्टुरू बसवलिंग महास्वामी यांचीही उपस्थिती असणार आहे. साहित्यिक डॉ. गो रु चन्नबसप्पा यांचे व्याख्यान होणार आहे. याचप्रमाणे सोलापूरहून विशेष निमंत्रित खासदार, गौडगाव हिरेमठाचे डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य उपस्थित राहणार आहेत, असे महांतेश कवटगीमठ यांनी सांगितले.

वेळी निडसोशी पंचमशिवलिंगेश्वर महास्वामी बोलताना म्हणाले, डॉ. प्रभाकर कोरे यांनी अनेक मुलांना शिक्षण पुरविले आहे. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून त्यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त सुत्तुर जगद्गुरू यांच्यासह भालकीपासून बेंगळुरू पर्यंतच्या विविध मठाधीशांच्या उपस्थितीत सत्कार समारंभ आयोजिण्यात आला आहे.
या पत्रकार परिषदेस रुद्राक्षी मठाचे डॉ. अल्लमप्रभू महास्वामी, कारंजी मठाचे गुरुसिद्ध महास्वामी, शेगुणसी महास्वामी आदी उपस्थित होते.


Recent Comments