Belagavi

कार्तिक दीपोत्सवात उजळून निघाले छत्रपती शिवाजी उद्यान !

Share

अंधार दूर करून नवचैतन्याची पेरणी करणारा दिवाळी हा प्रकाशाचा सण आहे. कार्तिक महिन्यात दिपोत्सव साजरा करणे ही हिंदू धर्माची प्रथा आहे. या हिंदू धर्माचे संरक्षक छत्रपती शिवाजी महाराज यांना बेळगावात कार्तिक मासानिमित्त दीपोत्सवाद्वारे विशेष अभिवादन करण्यात आले. यासंबंधी सादर आहे हा विशेष वृत्तांत.

सर्वत्र रंगीबेरंगी रांगोळ्या… आकाशाचे चुंबन घेणारा रंगीबेरंगी प्रकाशझोत… वारकर्यांच्या टाळ मृदंगाच्या गजरात निर्मण झालेले भक्तिमय वातावरण…
होय, तुम्ही पाहत असलेली ही दृश्ये बेळगावच्या छत्रपती शिवाजी उद्यानामधली आहेत. डॉ. शामाप्रसाद मुखर्जी रस्त्यावरील छत्रपती शिवाजी गार्डन येथे दरवर्षीप्रमाणे श्री राम सेना हिंदुस्थानच्या वतीने कार्तिक दीपोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

ज्यांच्यामुळे हिंदू समाज टिकला, वाढला… ज्यांच्यामुळे हिंदूंच्या अमूल्य मंदिरांचे, देवदेवतांचे रक्षण झाले… अशा राजा शिवछत्रपतींसाठी छत्रपती शिवाजी महाराजांना पहिला दिवा समर्पित म्हणून दीपप्रज्वलन करण्यासाठी शेकडो शिवभक्त उपस्थित होते. देवाच्या ध्वजाचे रक्षण म्हणून स्वराज्याची स्थापना झाली.

लक्षवेधी सुबक रंगीबेरंगी रांगोळ्या आणि त्याच्या जोडीला रंगीबेरंगी प्रकाशझोत टाकणाऱ्या विद्युत दिव्यांच्या पार्श्वभूमीवर सजावटीच्या आनंदात आणखीनच भर पडली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून सन्मान करण्यात आला. यावेळी वारकर्यांच्या टाळ-मृदंगाच्या तालावर सुमधुर अभंग गायनाने वातावरण भक्तीमय झाले होते. हे दृश्य पाहण्यासाठी दोन डोळे पुरेसे नाहीत.

श्री राम सेना हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांनी यावेळी सांगितले की, श्री राम सेना हिंदुस्थानच्या वतीने आम्ही हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यासाठी शिवाजी उद्यान येथे कार्तिक दीपोत्सवाचे आयोजन केले. पारंपारिक पद्धतीने दिपोत्सवाचे आयोजन केले जाते. आपल्या संस्कृतीचे संरक्षण आणि संवर्धन करण्याच्या हेतूने या दिपोत्सवाचे आयोजन केल्याची माहिती त्यांनी दिली.

यावेळी बेळगाव शहर व परिसरातील शिवभक्तांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन हा दिपोत्सव यशस्वी केला.

Tags:

kartika-deepotsava-chhatrapati-shivaji-garden/