बेळगाव महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. 29 मधील नागरी समस्यांवर चर्चा करण्यासाठी रविवारी बैठक पार पडली. बेळगाव दक्षिणचे आ. अभय पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीत प्रभागातील विविध नागरी समस्यांवर चर्चा करून उहापोह करण्यात आला.
बेळगाव मनपाच्या हद्दीत येणाऱ्या प्रभाग क्र. 29 मधील नागरी समस्यांवर चर्चा करण्यासाठी काल रविवारी आ. अभय पाटील यांच्या नेतृत्वाखाली बैठक पार पडली.
टिळकवाडी येथे त्रासदायक झालेली पार्किंगची समस्या, तसेच नवीन गॅस पाइप लाइन घालणे व इतर समस्यांवर या बठकीत चर्चा करण्याची आली. प्रभागातील नागरिकांनी विविध समस्या लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांसमोर मांडल्या.

आ. अभय पाटील यांनी अधिकाऱ्यांना, नागरिकांच्या समस्यांची सहानुभूतीपूर्वक दखल घेऊन त्या सोडविण्याचे निर्देश दिले. लवकरात लवकर या समस्या सोडवण्यात येईल असे आश्वासन यावेळी देण्यात आले. बैठकीला मनपा आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी, टिळकवाडी पोलीस स्थानकाचे सीपीआय दयानंद शेगुणशी, ट्रॅफिक सीपीआय बडीगेर तसेच प्रभागामधील नागरिक उपस्थित होते


Recent Comments