Vijayapura

विजापुरात संघाचे शानदार संचलन ; सर्वत्र भगवे झेंडे, लोकांनी फुलांची उधळण केली

Share

विजापूर शहरात आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शानदार पथ संचलन पार पडले. शहरातील प्रमुख मार्गांवर संचार करताना नागरिकांनी फुलांची उधळण करून या संचलनाचे हार्दिक स्वागत केले.

स्पॉट लाईट बसस्थानकाजवळून सुरू झालेल्या आरएसएस पथ संचलनात सहभागी स्वयंसेवकांवर नागरिकांकडून पुष्पवृष्टी करण्यात आली. संचलनानिमित्त संपूर्ण विजापूर नगरीत सर्वत्र भगवे झेंडे फडकले. गोदावरी हॉटेल, डोबळे गल्ली, उप्पली बुरुज, सराफ बाजार, राजपूत ओणी, नागुरा कॉलेजपर्यंत निघालेल्या पथसंचलनाची सांगता नागुरा कॉलेजमध्ये जाहीर कार्यक्रमाने झाली. मिरवणुकीत सहभागी झालेल्या हजारो गणवेशधारी स्वयंसेवकांनी शिस्तबद्ध शिपायांप्रमाणे संचलन केले. सवाद्य संचलनाला घोषपथकाने चांगलीच चमक आणली होती. मार्गावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रस्त्याच्या दुतर्फा ईभ्या नागरिकांनी ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम’च्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला.

Tags: