बेळगावातील राणी चन्नम्मा सर्कलमधील बसथांब्यात आज भाजप युवा मोर्चाच्या वतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
होय, बेळगावातील राणी चन्नम्मा सर्कल आणि सरदार कॉलेज मैदानाजवळील बसथांब्यात आज रविवारी भाजप युवामोर्चा कार्यकर्त्यांनी स्वच्छता मोहीम राबविली. हातात झाडू आणि पाण्याचे पाइप घेऊन कार्यकर्त्यांनी कचरा झाडून, पाणी शिंपडले आणि बसथांबे स्वच्छ केले.

यावेळी उत्तरचे आमदार तसेच महानगर अध्यक्ष, युवा मोर्चा अध्यक्ष, सरचिटणीस, जिल्हा प्रमुख शाखांचे सरचिटणीस व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.


Recent Comments