Vijayapura

सांगली जिल्ह्यातील जतमध्ये कर्नाटक राज्योत्सव

Share

कर्नाटकात बेळगावसह सर्वत्र कर्नाटक राज्योत्सव उत्साहात साजरा झाला. मात्र महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील जत येथेही यंदा जल्लोषात कर्नाटक राज्योत्सव साजरा करण्यात आला. पाहुयात याविषयीची एक खास बातमी…

जमीन, पाणी आणि भाषेच्या बाबतीत, शेजारच्या महाराष्ट्रात आणि कर्नाटकात भांडणे आहेतच. बेळगावात कर्नाटक राज्योत्सव साजरा होताना एकीकडे महाराष्ट्र एकीकरण समितीने काळा दिवस साजरा केला असतानाच दुसरीकडे, महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात कन्नड प्रेम आणि बंधुभावाचा संदेश देण्यात आला. बालगाव गावात कन्नड भाषिकांकडून कर्नाटक राज्योत्सव साजरा करण्यात आला. कन्नड साहित्य परिषद महाराष्ट्र शाखा आणि आदर्श कन्नड बळग यांनी बालगावच्या गुरुदेवाश्रमात याचे आयोजन केले होते.

अमृतानंद महास्वामीजी यांनी सूत्रसंचालन केले. कन्नड ध्वजारोहण केल्यावर भुवनेश्वरी मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमात कन्नड समर्थक घोषणाबाजीही करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवणारे अमृतानंद महास्वामी यांनी, आम्ही कर्नाटकापासून दूर असलो तरी, आमचे मन नेहमी कन्नड भाषेची पूजा करते. सीमाभागातील कन्नडिगांच्या उत्कर्षासाठी दोन्ही सरकारांनी पुढे यावे. कन्नड साहित्य परिषद महाराष्ट्र शाखा आणि आदर्श कन्नड बळग या संस्थांनी महाराष्ट्राच्या भूमीत कन्नड वाचवण्याचे कार्य अविरतपणे केले आहे, हे खरोखरच कौतुकास्पद असल्याचे ते म्हणाले.

कार्यक्रमात महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातील कन्नडिगांकडे लक्ष देण्याचे सरकारला आवाहन करण्यात आले. राज्योत्सव पुरस्कार देताना सीमाभागातील कन्नडीगांना प्राधान्य द्यावे. परराज्यात राज्योत्सव साजरा करण्यासाठी कर्नाटक सरकारने दरवर्षी अनुदान द्यावे. इथल्या कन्नडिगाना राज्यातील कन्नडिगांप्रमाणेच वागवलं पाहिजे. तसेच कला-साहित्याला प्रोत्साहन देण्यासोबत नोकरीची सुरक्षाही दिली पाहिजे. विशेष आरक्षणासाठी येत्या काही दिवसांत कर्नाटकातील विधानसौधपर्यंत पदयात्रा काढण्यात येईल, असा निर्णय या कार्यक्रमात घेण्यात आला.
एकंदर, महाराष्ट्रातही कर्नाटक राज्योत्सव साजरा करून, सीमावर्ती भागातील कन्नडिगांनी त्यांचा स्वाभिमान दाखवून दिला आहे.

Tags:

rajyotsav-in-jatt-maharashtra/