दिवाळी सणानिमित्त बेळगावात प्रथमच ढोल-ताशा, ध्वज संचलन महावादन स्पर्धेचे आयोजन केले होते. या निमित्ताने ढोलताशांच्या कडकडाटाने शिवाजी उद्यानाचा परिसर दणाणून गेला.
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर काल, शनिवारी सायंकाळी बेळगावात प्रथमच बेळगावच्या वादकांनी महावादन ढोल-ताशा स्पर्धेचे आयोजन केले होते. डॉ. शामाप्रसाद मुखर्जी रोडवरील छत्रपती शिवाजी उद्यान परिसरातील शिवसृष्टीसमोर झालेल्या या अनोख्या स्पर्धेत बेळगावातील विविध 200 ढोलताशा पथके आणि ध्वजपथके सहभागी झाली होती. “छत्रपती शिवाजी महाराज की जय” असा जयघोष करत ढोल-ताशा पथकातील वादकांनी केलेल्या ढोलताशा वादनामुळं छत्रपती शिवाजी उद्यान परिसर दुमदुमून गेला

लयबद्ध, तालबद्ध पद्धतीने केलेले ढोलवादन आणि त्याच्या साथीने ध्वजपथकाने केलेले संचलन पाहताना उपस्थितांच्या अंगावर रोमांच येत होते. हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी बेळगावातील शेकडो नागरिक उपस्थित होते


Recent Comments