भारतीय जनता पक्ष बेळगाव ग्रामीण मंडळच्या वतीने, विधान परिषदेचे आमदार हणमंत निराणी यांच्या अनुदानातून विजयनगर येथील मराठी प्राथमिक सरकारी शाळेला 4×10 फुट लांबी रुंदीचे 7 ग्रीन बोर्ड देण्यात आले.
या प्रसंगि बोलताना भाजप बेळगाव ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव म्हणाले, भारतीय जनता पक्ष बेळगाव ग्रामीण मंडळच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. ग्रामीण भागातील मराठी आणि कन्नड शाळांची अवस्था बिकट आहे. उत्कृष्ठ दर्जाचे ग्रीन बोर्ड देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. सर्व शाळांना ग्रीन बोर्ड देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असे ते म्हणाले.विधान परिषद सदस्य हणमंत निराणी यांच्या अनुदानातून हे कार्य सुरू करण्यात आले आहे. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या मधला सेतू म्हणजे खडू आणि फळा. ज्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते. विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षक घ्यावे ह्याच उद्देशाने हे कार्य सुरू आहे असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. गीता कडोलकर होत्या. याप्रसंगी शैलेश उळवि, हिंडलगा ग्राम पंचायत माजी अध्यक्ष रामचंद्र मनोळकर, हिंडलगा ग्राम पंचायत उपाध्यक्षा भाग्यश्री कोकीतकर, नगरसेविका वीणा विजापूरे, विलास ताशीलदार, अजित हलकर्णी, अरुण काळसेकर, गुरुराज हलगत्ती, अनिल मद्यापगोळ, गणपत देसाई, रणजित पोटे आदींसह शाळेचे सर्व शिक्षक, शाळा सुधारणा समितीचे सदस्य उपस्थित होते.


Recent Comments