राज्यात असलेल्या १ कोटी ३० लाख पंचमसाली लिंगायत समाजाला सापत्नपणाची वागणूक देण्यात येत आहे, पंचमसाली समाजाच्या मागण्या मान्य न झाल्यास, राज्यात हिंसक संघर्ष सुरु होईल, असा इशारा बसवमृत्युन्जय स्वामींन दिला.
अक्कतंगेरहाळ गावात शनिवारी जिल्हा पंचायत व्याप्तीत पंचमसाली संघटनेच्यावतीने अल्पसंख्यांक महिलांची कुंभमेळा मिरवणूक आयोजित करण्यात आली होती. या मिरवणुकीला मार्गदर्शन करताना बसवमृत्युन्जय स्वामी बोलत होते. यावेळी लिंगायत पंचमसालींमध्ये आरक्षण लढ्याबाबत जनजागृती केली.
स्वामीजी पुढे म्हणाले, गोकाक मतदार संघातील इतिहास लिहिणारे सत्ताकेंद्र म्हणजे अक्कतंगेरहाळ हे गाव आहे. आपल्या समाजात एकता नसल्याने आपल्यासमोर अडचणी उभ्या आहेत. सरकारला इशारा देण्यासाठी १३ नोव्हेंबर रोजी गोकाकमध्ये भव्य जनजागृती सभा आयोजित करण्यात आली आहे. आपल्याला खोटी आश्वासने देण्यात आली त्यांची सत्ता गेली, आता बसवराज बोम्मई सरकारने योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणीही स्वामीजींनी केली.
यानंतर ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, पंचमसाली समाजाचे माजी आमदार निंगाप्पा करलिंगनवर यांच्या समाधीस्थळाला भेट देण्यात आली. पदयात्रेत सहभागी झालेल्या सर्वांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती.


Recent Comments