कर्नाटक राज्य रयत संघटना आणि हरित सेना नेत्यांनी चिक्कोडी उपविभागातील विविध साखर कारखान्यांना निवेदन देऊन उसाला प्रतिटन ३५०० रुपये दर देण्याची मागणी केली.

कर्नाटक राज्य रयत संघटना व हरित सेनेच्या नेत्यांनी हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखाना, अरिहंत शुगर इंडस्ट्रीज यांना भेट देऊन कारखान्यांच्या प्रतिनिधींना प्रतिटन 3500 रुपये उसाला भाव देण्याच्या मागणीचे निवेदन दिले.

यावेळी रयत संघटनेचे प्रदेशाध्यक्ष चुनप्पा पुजेरी, प्रदेश उपाध्यक्ष शिवानंद मुगळीहाळ, पदाधिकारी गणेश इळीगेर, राजू पोवार आदी शेतकरी नेते उपस्थित होते.


Recent Comments