Belagavi

कर्नाटकचे राज्यपाल गेहलोत यांनी कोल्हापुरात घेतले महालक्ष्मीचे दर्शन

Share

कर्नाटक राज्याचे महामहिम राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी आज शुक्रवारी (४ नोव्हेंबर) महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीतर्फे गेहलोत दाम्पत्याचा गौरव करण्यात आला.


राज्यपाल थावरचंद गेहलोत आणि महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची आज कोल्हापूरमधील रेसिडेन्सी क्लबमध्ये महत्वाची बैठक होणार आहे. त्यासाठी राज्यपाल थावरचंद गेहलोत आज कोल्हापूर भेटीवर आहेत. या दरम्यान, त्यांनी सपत्नीक श्री महालक्ष्मीचे दर्शन घेतले.

Tags:

karnataka governor thavar chand gehlot took kolhapur mahalakshmi darshan workship