Belagavi

एसएसए फौंडेशनचे पोलीस, नागरी सेवकांसोबत रक्षाबंधन

Share

एसएसए फौंडेशन, बेळगावतर्फे आज अनोखा रक्षाबंधन सोहळा साजरा करण्यात आला.
होय, एसएसए फौंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी आपले शहर स्वच्छ ठेवणारे नागरी सेवक आणि रुग्णांची सेवा करणारे सरकारी रुग्णालयातील कर्मचारी यांच्यासह रक्षाबंधन साजरा केला. यावेळी आरती करून सर्वांना मिठाई वाटण्यात आली व रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी डीसीपी पी.व्ही. स्नेहा यांनाही रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. कर्तव्याच्या दबावामुळे या कर्मचाऱ्यांना कुटुंबासोबत कोणताही सण साजरा करता येत नाही. त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत सण साजरा केला, असे एसएसए फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी प्रेमा पाटील, कीर्ती चौगुले, शुभांगी पवार, रेखा बेनके, दीपक पांडे, अरुणकुमार जयवंत, सायमन माँटेरियो, गौतम कांबळे आदी उपस्थित होते.

Tags:

ssa-foundation-raksha-bandhan-celebration-with-police/