Vijayapura

पराभूत भाजप उमेदवार समर्थकांकडून हल्ला

Share

विजापूर महापालिकेच्या निवडणुकीत पराभूत झालेल्या भाजप उमेदवार आणि त्याच्या समर्थकांनी एका व्यक्तीवर हल्ला केल्याची घटना उशिराने समोर आली आहे.
देवकांत बिज्जरगी असे मारहाणीत जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक दोनमध्ये भाजपचे उमेदवार राहुल औरंगाबाद यांचा पराभव झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी देवकांत यांच्यावर हल्ला केला. देवकांत बिज्जरगी यांच्यावर विजापूर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आपल्याला पाच-सहा जणांनी दगडाने हल्ला केल्याचा आरोप बिज्जरगी यांनी केला. ही घटना आदर्श नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

Tags:

man-attacked-by-defeated-bjp-candidate-and-supporters/