Belagavi

जमीन, पाणी, भाषा आंदोलनात लिंगायत मठ आघाडीवर : डॉ. तोंटद सिद्धराम स्वामी

Share

१२ व्या शतकात बसवेश्वर महाराजांनी दिलेल्या आदर्श आजच्या लिंगायत समाजापर्यंत पोहोचविण्याचे म्हण कार्य हानगल कुमार शिवयोगींसारख्या अनेक मठाधीशांनी केला असे मत गदग डंबळ तोंटद जगद्गुरू डॉ. तोंटद सिद्दराम महास्वामी यांनी व्यक्त केले.

बेळगावच्या कारंजी मठाच्या २२ व्या वार्षिकोत्सवानिमित्त तसेच राज्योत्सव आणि हनगल कुमार शिवयोगी यांच्या १५५ व्या जयंती निमित्त आयोजिण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. लिंगायत मठ धर्मप्रसारासह शिक्षण क्षेत्रातही अपार सेवा करत आहेत. शिवाय भाषा, जमीन आणि पाणी प्रश्नी संघर्षात लिंगायत मठ आघाडीवर आहेत. हनगल शिवयोगींच्या प्रेरणेतून केएलई संस्थेला अधिक बळ मिळाले हा इतिहास आहे. त्यामुळे लिंगायत समाजाच्या उन्नतीसाठी मठाधीशांच्या जबाबदारी वाढ झाल्याचे स्वामीजी म्हणाले.

यानंतर हुक्केरी मठाचे सदाशिव महास्वामी बोलताना म्हणाले, बसवेश्वरांच्या तत्वांचे पालन करण्यासाठी बेळगावमधील कारंजी मठाचे गुरुसिद्ध महास्वामी दार महिन्यात शिवअनुभवावर आधारित प्रवचन देतात, हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. प्रभाकर कोरे यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त श्रीमठाच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना डॉ. प्रभाकर कोरे म्हणाले, आपल्या शरीराला जरी ७५ वर्षे झाली असली तरी आपले मन आजही २५ वर्षाप्रमाणेच आहे. यापुढील काळात देखील आपल्या साऱ्यांच्या आशीर्वादाने के एल इ संस्थेच्या माध्यमातून अशाचपद्धतीने जनतेची सेवा करण्याची शक्ती आपल्याला मिळूदे, असे ते म्हणाला.ए

शेगुणसी विरक्तमठाचे महंत महास्वामी यांनी हनगल कुमार महास्वामी जीवन दर्शन यावर आधारित प्रवचन दिले. बेळगावच्या नागनूर रुद्राक्ष मठाचे डॉ. अल्लमप्रभू महास्वामी यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. कारंजीमठाचे गुरुसिद्ध महास्वामी यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या कार्यक्रमात बोलताना गुरुसिद्ध महास्वामी यांनी कन्नड राज्य आणि कन्नड भाषेसाठी दिलेल्या योगदानाचे त्यांनी स्मरण केले.

कारंजी मठाचे डॉ. शिवयोगी देव यांच्या दिव्य सानिध्यात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार अनिल बेनके प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. श्रीमठाच्या मातृमंडळींनी वचन प्रार्थना गायिली. प्रो. श्रीकांत शानवाड यांनी प्रास्ताविक आणि स्वागत केले. ए के पाटील यांनी आभार मानले. ऍड. व्ही के पाटील यांनी सूत्रसंचलन केले.

Tags: