महिला अबकारी निरीक्षक आणि बार मालक यांच्यातील संभाषणाचा व्हिडिओ विजापुरात चांगलाच व्हायरल झाला आहे. तुम्ही डीसीला देता, जेसीला देता, आम्हाला का देत नाही, असा प्रश्न केल्याचे आणि ‘हप्ता दिला तर ठीक, नाहीतर तुमचे खरे नाही’ अशी धमकी दिल्याचं या संभाषणातून ऐकू येत आहे.
होय, विजापुरात उत्पादन शुल्क विभागाच्या एका महिला अधिकाऱ्याचा हा व्हिडिओ आहे. तुम्ही डीसीला, जेसीला हप्ता देता, मग आम्हाला का देत नाही, असा सवाल यात केलाय. विजापूर जिल्ह्यातील मुद्देबिहाळ येथील एक्साईज इन्स्पेक्टर ज्योती मेत्री यांचा हा आवाज आहे. जून आणि जुलै महिन्याची हप्त्याची थकबाकी द्यावी, असा युक्तिवाद अधिकाऱ्याने केला असता बारमालकांनी ते देण्याचे मान्य केले. शिवाय
प्रत्येक बारसाठी 15 हजार हप्ता देण्यास सांगणारा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. सर्वत्र व्हायरल झालेल्या या व्हिडिओमुळे उत्पादन शुल्क विभागातील गैरप्रकारांवर प्रकाश पडला आहे. खुल्लम खुल्ला अधिकाऱ्याने लाच मागितल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. या अधिकाऱ्यावर सरकार काय कारवाई करणार हे पहावे लागेल.


Recent Comments