विविध गुन्ह्यात सहभागी असलेल्या १४ गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना चिकोडी उपविभागाचे उपविभागीय दंडाधिकारी संतोष कामगौडा यांनी हद्दपार करण्याचे आदेश बजावले आहेत.
विविध पोलीस स्थानकांच्या अहवालाच्या आधारे हि कारवाई करण्यात आली असून सामाजिक शांतता बिघडविणे, वारंवार गुन्हेगारी कृत्यात सहभागी होणे, गुंडगिरी, मटका यासह अवैध धंद्यात सहभागी होणे यासह विविध गुन्ह्यांच्या आधारे पोलिसांना डोकेदुखी ठरलेल्या चिकोडी विभागातील १४ जणांवर हि कारवाई करण्यात आली आहे. रायबाग तालुक्यातील सहा जणांचा यात समावेश असून यापैकी कुडची येथील चौघांचा समावेश आहे. अकोला येथील एकाला ९ महिने हद्दपार होण्याचे आदेश दिले आहेत. तर अथणी तालुक्यातील पाच जणांवर कारवाई झाली आहे.
या सर्व व्यक्तींचा अहवाल विभागीय दंडाधिकारी तथा प्रांताधिकारी यांच्याकडे आला होता. त्यावर बाजू मांडण्यासाठी स्वतः अथवा वकिलांच्यावतीने हजर न झाल्याने दंडाधिकाऱ्यांनी या कारवाईचे आदेश दिले आहेत. या सर्व जणांवर दिलेल्या हद्दपारीची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होत असल्याची खात्री करण्यासही संबंधित पोलीस स्थानकांना कळविण्यात आले आहे.
अकोला येथील चंद्रकांत शंकर वड्डर याच्यावर निपाणी ग्रामीण पोलीस स्थानकात २००१ पासून ३७ गुन्हे दाखल असून त्यापैकी ३३ गुन्ह्यांसाठी त्याला शिक्षा झाली आहे. तर ३ प्रकरणात चौकशी आणि एका प्रकरणाचा तपास सुरु आहे. त्याला कोलार जिल्ह्यात राहून दररोज पोलीस स्थानकात हजेरी द्यावी लागणार आहे. याचप्रमाणे संजय चंद्रकांत पराकट्टी याला निपाणी मधून रामदुर्ग जिल्ह्यात १ महिन्यासाठी, अल्ताफ हुसेन मेवेगार याला कुडचीमधून कोलार जिल्ह्यात ६ महिन्यासाठी, प्रदीप प्रकाश करडी याला ककमरी येथून कोलार जिल्ह्यात २ महिन्यांसाठी, साहेबहुसेन सादापीर चमनमलिक याला कुडची येथून यादगिरी येथे ६ महिन्यांसाठी नजीर हुसेन तांबाळी याला कुडची येथून रायचूरमध्ये ३ महिन्यांसाठी ,
लक्ष्मण वसंत पोळ याला चिंचली मधून यादगरी येथे ३ महिन्यांसाठी , मीरासाब गंगाराम बागडी याला मदभावी येथून कोप्पळ येथे १ महिन्यांसाठी , महादेव यल्लाप्पा कांबळे याची उगार बुद्रुकमधून विजापूर जिल्ह्यात २ महिन्यांसाठी , बाबासाब कुतुबुद्दीन नदाफ याची मोरब येथून रायचूर येथे ५ महिन्यांसाठी , कासप्पा रामपा कारिकोळ्ळ याची हालळ्ळी येथून रायबाग मधील हंदिगुंद येथे १ महिन्यांसाठी, अलिमुर्तझा दादेपीर याला कडचीमधून रायचूरमध्ये ३ महिन्यांसाठी, सदाशिव सत्याप्पा गोड्माले याला रडेरहट्टी मधून कोप्पळ येथे १ महिन्यांसाठी , रवी सुरेश शिंगे याला कोहळ्ळी येथून कोप्पळ येथे २ महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजीव पाटील यांनी दिली.


Recent Comments