अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून जिल्हा प्रशासनामार्फत केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले, तसेच देशभरात ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे प्रवासाच्या तिकिटात सवलत द्यावी, या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचलेल्या अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना मागण्यांचे निवेदन दिले.
लोंढा ते मिरज, कॅसलरॉक ते मिरज आणि हुबळी ते मिरजेपर्यंत धावणाऱ्या स्थानिक पर्यटक रेल्वेच्या तिकीटदरात एकाचवेळी अचानक वाढ केल्याने स्थानिकांची मोठी गैरसोय होत आहे. रेल्वे विभागाने तत्काळ भाडे कमी करावे. त्याचप्रमाणे बेळगाव ते मिरज आणि कोल्हापूर मार्गे कोल्हापूर-बंगलोर (चन्नम्मा एक्स्प्रेस) प्रवासाचे भाडे कमी करण्यासह इतर मागण्या पूर्ण करण्याची मागणी काशिराम चव्हाण यांनी केली.
यावेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष काशिराम चव्हाण, पी. एल. राजपूत, वकील यु. जे. तळवार, मुरली चव्हाण आदी उपस्थित होते


Recent Comments