Belagavi

बेळगावमधील राज्योत्सवात कन्नड अभिनेत्यांचा सहभाग

Share

बेळगावमध्ये आज भव्य प्रमाणात कन्नड राज्योत्सव साजरा करण्यात आला. राज्योत्सव मिरवणुकीत आज कन्नड चित्रपट सृष्टीतील अभिनेत्यांनी सहभाग घेत डायलॉगबाजी करून उपस्थितांची मने जिंकली.

कर्नाटक राज्योत्सवाच्या निमित्ताने बेळगावमध्ये कन्नड भाषिकांनी भव्य मिरवणुकीचे आयोजन केले असून राणी चन्नम्मा चौकात अभिनेते साईकुमार यांनी आपल्या खास शैलीत डायलॉग बाजी करून कन्नड भाषिकांची मने जिंकली. राणी चन्नम्मा चौकात हुक्केरी हिरेमठाचे चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी यांच्या उपस्थितीत राणी चन्नम्मा पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी बोलताना अभिनेते साईकुमार म्हणाले, आपली मातृभाषा तेलगू आहे. मात्र आपल्या जीवनात आपण कन्नड भाषेचा अधिक वापर केला आहे. आपल्याला सिंह म्हणून कन्नड भाषिकांनी गौरविले. मात्र आपण कन्नड भाषिकांनी दिलेल्या या गौरवामुळेच सिंह बनू शकलो असे सांगत त्यांनी अग्नी या चित्रपटातील डायलॉग बोलून उपस्थितांची मने जिंकली.

Tags:

belagavi-rajyotsava-saikumar/