कर्नाटक राज्योत्सव साजरा करण्यासाठी बेळगावमधील कन्नड संघटनांना अनुदान देण्यात यावे, अशी मागणी राजकुमार टोपाण्णावर यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.
सीमाभागात कन्नड भाषा संवर्धनासाठी, राज्योत्सव साजरा करण्यासाठी कन्नड संघटनांना,अनुदान देण्यात यावे, अशी मागणी करत राजू टोपाण्णावर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.

याबाबत बोलताना राजू टोपाण्णावर म्हणाले, कर्नाटक राज्योत्सव भव्य प्रमाणात साजरा करण्यात येतो. सरकार बेंगळुरू मधील कन्नड संघटनांना केवळ अनुदान देते. उत्तर कर्नाटकातील कन्नड संघटनांवर अन्याय होत असून बेळगावमध्येही भव्य पद्धतीने साजऱ्या होणाऱ्या राज्योत्सव दिनासाठी अनुदान देण्याची मागणी त्यांनी केली.
यावेळी आम आदमी पक्षाचे जिल्हा संयोजक शंकर हेगडे, अब्दुल तवाब शेख, बसीर अहमद जमादार आदी उपस्थित होते.


Recent Comments