Belagavi

जागतिक अस्थी व सांधे दिनानिमित्त बेळगावात जनजागृती रॅली

Share

20 ऑक्टोबर रोजी जागतिक अस्थी व सांधे दिनानिमित्त बेळगावात जनजागृती रॅली काढण्यात आली.

रोटरी क्लब ऑफ बेलगाम नॉर्थ आणि केएलई शताब्दी चॅरिटेबल हॉस्पिटल येळ्ळूर रोड यांच्या वतीने आज, सोमवारी जागतिक अस्थी व सांधे दिनानिमित्त आरोग्य जनजागृती जथा काढण्यात आला. शहरातील पवन हॉटेलपासून हा जथा सुरू होऊन सेंट झेवियर्स स्कूल क्रॉस मार्गे कॅम्पच्या मेसॉनिक हॉलपर्यंत काढण्यात आला. यावेळी वैद्यकीय विद्यार्थ्यांनी हातात आरोग्य जनजागृतीचे फलक घेऊन जनजागृती केली.


केएलई शताब्दी चॅरिटेबल हॉस्पिटलचे संचालक डॉ. एस.सी. धारवाड यांनी आमच्या इनन्यूज-आपली मराठीशी बोलताना सांगितले की, जागतिक अस्थी व सांधे दिनानिमित्त आरोग्य जनजागृती जथा काढण्यात आला आहे. यानंतर डॉ. राजशेखर यांच्या अध्यक्षतेखाली एक कार्यक्रम होणार आहे. डॉ. पुट्टी, जगदीशा हाडांची ठिसूळता टाळण्यासाठी काय करावे याबद्दल योग्य माहिती देतील. बहुतेक लोकांना गुडघेदुखीचा त्रास होतो. अशावेळी अशा लोकांनी ताबडतोब तज्ज्ञ डॉक्टरांना भेटून तपासणी करून घेणे चांगले. हाडांमध्ये कॅल्शियमचे प्रमाण कमी होणे आणि हाडांची झीज होणे यामुळे ऑस्टिओपोरोसिसची समस्या उद्भवते. ऑस्टिओपोरोसिस हा एक प्रकारे सायलेंट किलर आहे. वयाच्या 30, 40 व्या वर्षी विशेषतः महिलांमध्ये ही समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येते. त्यामुळे आरामात फिरणे कठीण होते. समस्या अधिक जटील झाल्यावर डॉक्टरांना भेटण्यापेक्षा सुरुवातीच्या टप्प्यातच डॉक्टरांना भेटणे आणि उपचार घेणे अधिक प्रभावी आहे असे त्यांनी सांगितले.

या रॅलीत रोटरी क्लब ऑफ बेळगाव नॉर्थचे अध्यक्ष जी. एस. पाटील, डॉक्टर व वैद्यकीय विद्यार्थी सहभागी झाले होते.

Tags:

belgaum OSTEOPOROSIS DAY Jawareness rally