गड-किल्ले विकासासाठी काकती येथील शेकडो शिवभक्तांनी काकती ते रायगड प्रवासाला आज प्रारंभ केला.
बेळगाव तालुक्यातील काकती येथील अनेक शिवभक्तांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांच्या संवर्धन आणि माहितीच्या संयुक्त मोहिमेत सहभागी होण्यासाठी रायगडला रवाना झाले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवकालीन इतिहास सांगणारे शेकडो वर्षे जुने किल्ले जतन करणे अत्यावश्यक आहे. तसेच सध्याच्या तरुणांना त्यांची माहिती देण्याची गरज आहे. त्यामुळे बेळगाव तालुक्यातील काकती येथील संयुक्त शिवभक्त अभियान मंडळाचे नेते सदानंद चौगुले यांच्या नेतृत्वाखाली सुमारे अडीचशे शिवभक्तांनी काल रात्री काकती ते रायगड असा प्रवास सुरु केला आहे. त्यांचा हा दौरा रायगड, जंजीरा मार्गे असणार आहे.


Recent Comments