बेळगाव ग्रामीण मतदारसंघाच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते गणेशपूरमध्ये नव्याने सुरू झालेल्या सैनिक को-ऑप क्रेडिट सोसायटीचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी बोलताना आमदार लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या, “सैनिकांना फायदा व्हावा, या उद्देशाने ही सोसायटी सुरू करण्यात आली आहे. पाऊस, वारा, थंडी याची तमा न बाळगता देशसेवेत तत्पर असलेल्या आपल्या सैनिकांची सेवा खरोखरच वाखाणण्याजोगी आहे, त्यांच्या सेवेमुळे आपण सर्व सुरक्षित आहोत. सैनिक ही या देशाची संपत्ती आहे.त्यांना सदैव ओळख आणि सन्मान मिळाला पाहिजे.

या प्रसंगी राजाराम कोळे, हरिचंद्र पाटील, एपीएमसी अध्यक्ष युवराज कदम, उत्तम पाटील, शाहू पाटील, सुबराव भोगन, राजाराम फडके, सदानंद साळुंके, विनायक देवकर, तुकाराम कांबळे, संजीवनी पाटील, सविता जाधव, गणपती अलोळकर, जिवबा किवडे, ऋषिकांत खुळे, रावजी जाधव, विश्वनाथ पाटील, रामचंद्र पाटील, मारुती काझारी, कॅम्प सीपीआय प्रभाकर धर्मट्टी, अरुण कटांबळे, मारुती सनदी, सिद्दी कुलकर्णी, विलास घाडी आदी उपस्थित होते.


Recent Comments