Belagavi

हुक्केरी हिरेमठात राज्योत्सवाच्या निमित्ताने पुरणपोळीची मेजवानी

Share

कर्नाटक राज्योत्सवाच्या पार्श्वभूमीवर बेळगावमध्ये जय्यत तयारी सुरु असून हुक्केरी हिरेमठात राज्योत्सव मिरवणुकीत सहभागी होणाऱ्यांसाठी पुरणपोळीच्या मेजवानीचा बेत आखण्यात आला आहे.

१ नोव्हेंबर रोजी साजऱ्या होणाऱ्या राज्योत्सवानिमित्त लाखो कन्नड भाषिक मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. या मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या प्रत्येकासाठी अनेक वर्षांपासून हुक्केरी हिरेमठात जेवणाची सोय केली जाते. यावर्षी हुक्केरी हिरेमठाचे डॉ. शिवाचार्य महास्वामी यांनी मठाच्यावतीने पुरणपोळीच्या मेजवानीचा बेत आखला आहे.

पुरणपोळीच्या जेवणाची तयारी आतापासूनच सुरु करण्यात आली असून सरदारांस मैदान येथे जेवणाची सोय करण्यात आली आहे. हे जेवण बनविण्यासाठी १५० मुली आणि महिला तर ५० पुरुष तयारी करत आहेत. भात, आमटी, पुरणपोळी यासह विविध प्रकारचे पदार्थ बनविण्यात येणार आहेत.

Tags: