Belagavi

बेळगाव हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात “कोटी कंठ गीत गायन”

Share

बेळगाव हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात ‘ कोटी कंठ गीत गायन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

हिंडलगा कारागृह मुख्य अधीक्षक कृष्णकुमार, अधिकारी, कर्मचारी आणि कैद्यांच्या सहभागाने राज्योत्सवाच्या निमित्ताने कोटी कंठ गीत गायन कार्यक्रम पार पडला.

यावेळी बोलताना हिंडलगा कारागृह मुख्य अधीक्षक कृष्णकुमार म्हणाले, कोटी कंठ गीत गायन कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी आपल्याला मिळाल्याचा आपल्याला अभिमान आहे. आपण कर्नाटकात जन्मलो हे आपले पुण्य असून प्रत्येकाच्या आयुष्यात आई आणि मातृभाषेला अनन्यसाधारण महत्व आहे. आपल्या भावना व्यक्त करण्याचे साधन म्हणजे मातृभाषा असून कन्नड भाषिक लोक प्रेमळ, शांतीप्रिय आणि साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरीत अव्वलस्थानी असल्याचे ते म्हणाले. आठ ज्ञानपीठ पुरस्कारांसह कन्नड कवी साहित्य विश्वात आघाडीवर आहेत. कोटी कंठ गीतगायनाच्या माध्यमातून कन्नड भाषा, संस्कृती आणि वारसा जतन करण्याचे काम होईल, असे ते म्हणाले.

यावेळी उपस्थितांनी कन्नड भाषा संवर्धनासाठी शपथ घेतली. या कार्यक्रमास कारागृहाचे मुख्य वैद्याधिकारी महेश नागरबेट्ट, प्रशासकीय अधिकारी बाबू एस पुजारी, सहायक अधीक्षक शहाबुद्दीन कालेखान, लेखापाल एस सी जालगेरी, जेलर यल्लाप्पा नायक, राजेश धर्मट्टी, बसवराज भजंत्री, सहायक जेलर प्रकाश कांबळे आदी उपस्थित होते. व्याख्याते शशिकांत यादगुडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Tags:

in-belgaum-hindalga-jail-koti-kanth-gayan-2022/