लाखो चित्रपट रसिकांच्या गळ्यातील ताईत अप्पूच्या चाहत्यांचा बहुप्रतिक्षित ‘गंधद गुडी’ हा चित्रपट आज प्रदर्शित झाला. यानिमित्त बेळगावातील चित्रपटगृहांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.
पॉवर स्टार अप्पू उर्फ पुनीत राजकुमार अभिनीत शेवटचा कन्नड चित्रपट ‘गंधद गुडी’ आज राज्यभरात प्रदर्शित झाला आहे. बेळगावातही तीन चित्रपटगृहात हा चित्रपट प्रदर्शित झाला. स्वरूप-नर्तकी, कार्निव्हल आणि आयनॉक्स या तीन थिएटरमध्ये सकाळी 10:45 वाजता चित्रपटाच्या पहिल्या शोसाठी शेकडो चाहत्यांनी तुफान गर्दी केली होती.
शेकडो चाहत्यांनी अप्पूचे चित्र असलेले टी-शर्ट परिधान करून प्रथम अप्पूच्या प्रतिमेचे पूजन केले. त्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करून आनंद साजरा केला.
पहिल्या शोला चांगला प्रतिसाद मिळाला. ‘गंधद गुडी’ हा चित्रपट पाहण्यासाठी येणाऱ्या अप्पूच्या चाहत्यांकडूनही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांना रोपटे देऊन पर्यावरण रक्षणाचा संदेशही देण्यात आला.


Recent Comments