Belagavi

बेळगावमध्ये राज्योत्सवानिमित्त “कोटी कंठ गायन”

Share

कर्नाटक राज्योत्सवाच्या निमित्ताने जिल्हास्तरीय कोटी कंठ गायन हा राज्यगीत गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

शुक्रवारी बेळगाव जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, कन्नड आणि संस्कृती विभाग तसेच महानगरपालिका यांच्या सहयोगाने ६७व्या कर्नाटक राज्योत्सवाच्या निमित्ताने सकाळी ११ वाजता जिल्हा क्रीडांगणावर कोटी कंठ गायन हा समूह राज्यगीत गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात विविध शाळेतील विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी सहभागी झाले होते.

कर्नाटक सरकारच्या आदेशानुसार यंदाच्या राज्योत्सवानिमित्त कोटी कंठ गायन २०२२ हा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहयोगातून हा कार्यक्रम यशस्वी करण्यात आला असून राज्यगीत गायनातून राज्याप्रती आदर व्यक्त करण्याची संधी देण्यात आल्याबद्दल आमदार अनिल बेनके यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.

यावेळी बेळगाव उत्तर मतदार संघाचे आमदार अनिल बेनके, बेळगाव मनपा आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी, बुडा आयुक्त प्रीतम नसलापुरे, तहसीलदार आर के कुलकर्णी, मनपा उपायुक्त भाग्यश्री हुग्गी, डॉ. संजय डूम्मगोळ आदी उपस्थित होते.

Tags:

belagavi-singing-program/