Belagavi

बेळगावात जेएनएमसीमध्ये कोटी कंठ गायन कार्यक्रम

Share

कर्नाटक सरकार आणि कन्नड आणि संस्कृती खाते यांच्या संयुक्त विद्यमाने कर्नाटक राज्योत्सवानिमित्त आज ‘कोटी कंठ गायन-2022’चे बेळगावात जेएनएमसी गार्डन येथे आयोजन करण्यात आले होते.

कर्नाटक सरकार आणि कन्नड आणि संस्कृती विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कर्नाटक राज्योत्सवाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव येथील जेएनएमसी कॅम्पसच्या उद्यानात शुक्रवारी कोटी कंठ गायन-2022 चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात केएलई स्कूल ऑफ म्युझिकच्या विध्यार्थ्यानी सुरेल आवाजात नाडगीत व अन्य गीते सादर केली.

केएलईचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे, डॉ. कोठीवाले, डॉ. व्ही. डी. पाटील, डॉ. महंतशेट्टी, डॉ. एम. व्ही. जाली आणि डॉ. एच. बी. राजशेखर आदी उपस्थित होते.
‘कोटी कंठ गायन-2022’मध्ये केएलई स्कूल ऑफ म्युझिकच्या सुमारे 200 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

Tags:

belagavi-karnataka-rajyotsava-singing-program/