बेळगावातील कावेरीनगर मंडोळी रोड येथील मनोप्रभा मंगल कार्यालय येथे दि. 23 ऑक्टोंबर 2022 रोजी कराटे बेल्ट परीक्षा पार पडली. या परीक्षेत एकूण 70 कराटेपटू सहभागी झाले होते.
बेळगाव जिल्ह्याचे मुख्य परीक्षक गजेंद्र काकतीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही परीक्षा घेण्यात आले. केतन कल्लाप्पा फाटके हा गेल्या 09 वर्षापासून मनोप्रभा मंगल कार्यालय येथील कराटे क्लासमध्ये सतत सराव करित आहे. त्याने जिल्हास्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत सहभागी होऊन विविध ठिकाणी पदके मिळविली. या कठीण परिश्रमातून इंडियन कराटे क्लब व बेळगाव जिल्हा स्पोर्ट्स कराटे असोसिएशनचे अध्यक्ष गजेंद्र काकतीकर यांच्या हस्ते केतन फाटके याला ब्लॅकबेल्ट, प्रमाणपत्र व चषक देऊन गौरव करण्यात आला. प्रशिक्षक हरीश सोनार यांचे त्याला मार्गदर्शन लाभत आहे. यावेळी पालक कल्लाप्पा फाटके व सुनिता फाटके यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मान करण्यात आला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इंडियन कराटे क्लबचे प्रशिक्षक विठ्ठल भोजगार, प्रभाकर किल्लेकर, परशुराम काकती, विजय सुतार, निलेश गुरखा, नताशा अष्टेकर, विनायक दंडकर, परशुराम नेकणार आणि हेमलता काकतीकर यांनी विशेष परिश्रम घेतले.


Recent Comments