विकासकामांसाठी महिलांचे सहकार्य आवश्यक असल्याचे मत आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी व्यक्त केले. बेळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघांतील बडाल अंकलगी गावात आयोजित हळदीकुंकू कार्यक्रमात सहभागी झालेल्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी गावातील समस्यांवर स्थानिकांशी चर्चा केली.
आमदार झाल्यावर बेळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्याचा आपला निर्धार होता, त्यानुसार अपेक्षेपेक्षा जास्त विकास कामे मोठ्या प्रमाणात झाली आहेत. पुढील विकासासाठी विशेषत: महिलांचे आणि ज्येष्ठांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.आजवर मतदारसंघातील जनतेने अभूतपूर्व विकासकामांना मोठे सहकार्य दिले असून भरभरून प्रेम व विश्वास व्यक्त केला आहे. हीच पुढील विकासाची प्रेरणा असल्याचे लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले.
यावेळी ग्रामस्थ, स्थानिक लोकप्रतिनिधी, व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


Recent Comments