बेळगाव ऍपटेकच्या दोन विद्यार्थिनींनी देशातील प्रतिष्ठित विमान कंपन्यांमध्ये नोकरी मिळवून कुंदानगरीची कीर्ती वाढवली आहे.
होय, बेळगावच्या ऍपटेक एव्हिएशन अँड हॉस्पिटॅलिटी अकादमी येथे प्रशिक्षण घेतलेली विद्यार्थिनी स्नेहल कदमची इंडिगो एअरलाइन्समध्ये केबिन क्रूसाठी निवड झाली तर संयोगिता पाटीलची इंडिगो एअरलाइन्समध्ये ग्राउंड स्टाफ पदासाठी निवड झाली आहे. मंगळवारी ऍपटेक कार्यालयात या दोन्ही विद्यार्थिनींचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमास आलेल्या मान्यवरांनी या दोन्ही विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या कारकिर्दीत यश मिळवण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

विमान कंपनीत नोकरी मिळालेल्या स्नेहल आणि संयोगिता यांनी, प्रसारमाध्यमांशी बोलताना आनंद व्यक्त केला. ऍपटेकमध्ये आम्हाला मिळालेल्या प्रशिक्षणाने आज आमच्या भविष्यासाठी एक भक्कम पाया घातला आहे. विमानसेवाक्षेत्र हे उत्कृष्ट सेवाक्षेत्र आहे. त्यामुळे या क्षेत्रात नोकरीच्या अनेक संधी आहेत. त्यामुळे आजच्या विद्यार्थ्यांना ऍपटेकमध्ये येऊन प्रशिक्षण घ्या आणि तुमचे भविष्य घडवा, असा सल्ला त्यांनी दिला.

ऍपटेकचे बिझनेस पार्टनर विनोद बामणे म्हणाले की, ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांनी येथे कठोर प्रशिक्षण घेतले आहे आणि ते प्रतिष्ठित विमान कंपन्यांमध्ये काम करत आहेत.

प्रमुख पाहुण्या म्हणून आलेल्या आश्रय फाऊंडेशनच्या नागरत्ना रामगौडा म्हणाल्या की, जीवनात काहीतरी साध्य करण्याचे ध्येय प्रत्येकाचे असले पाहिजे. असे ध्येय ठेऊन या दोन विद्यार्थिनींनी आज त्यांचे स्वप्न साकार केले असून, त्या विमानसेवा क्षेत्रात सेवेसाठी सज्ज झाल्या आहेत. ऍपटेकचे विनोद व ज्योती बामणे यांनी विद्यार्थ्यांना चांगले प्रशिक्षण देत असल्याचे कौतुक केले.

या कार्यक्रमास स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, ऍपटेकचे शाखा व्यवस्थापक प्रकाश पाटील व विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते.


Recent Comments