Vijayapura

विजापुरात खासगी रुग्णालयाला आग; सुदैवाने जीवहानी नाही 

Share

एका खासगी रुग्णालयाच्या वरच्या खोलीत अचानक शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याची घटना विजापूर शहरात घडली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

विजापूर बसस्थानकाजवळील अनुग्रह नेत्र रुग्णालयाच्या एका खोलीत आगीची दुर्घटना घडली. दिवाळी अमावस्येच्या दिवशी म्हणजेच ग्रहणाच्या दिवशी रुग्णालयातील एका खोलीला आग लागल्याची घटना घडली.

आग लागलेल्या खोलीतील सर्व महत्त्वाची कागदपत्रे आगीत जळून खाक झाली आहेत. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग विझवली.

ही घटना गांधीचौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

Tags: