चाणक्य युवक मंडळातर्फे चन्नम्मा विजयोत्सव
बेळगावातील चाणक्य युवक मंडळातर्फे वीर राणी कित्तूर चन्नम्मा यांचा विजयोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला.
बेळगावच्या मठ गल्ली येथील चाणक्य युवक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी वीरराणी कित्तूर चन्नम्मा यांचा विजयोत्सव आज सोमवारी साजरा करण्यात आला. यावेळी राणी चन्नम्मा पुतळ्याचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी चाणक्य युवक मंडळाचे अध्यक्ष अरुण बेल्लद, माजी नगर सेवक पद्मराज वैजन्नावर, सम्राट चौगुले, सम्मेद चौगुले, अभिषेक चौगुले, देवेंद्र कळ्ळीमनी, आदित्य बेल्लद आदी उपस्थित होते.


Recent Comments