Gokak

केपीटीसीएल परीक्षा घोटाळाप्रकरणी आणखी ६ अटकेत

Share

केपीटीसीएल परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणी आणखी ६ आरोपींना अटक करण्यात गोकाक पोलिसांना यश आले आहे.

केपीटीसीएल परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणात आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या २९ वर जाऊन पोहोचली आहे. आज गोकाक तालुक्यातील बगरनाळ येथील इराण्णा मल्लप्पा बंकापूर वय २६, शिवानंद रामाप्पा कामोजी वय २२, रामदुर्ग तालुक्यातील बटकुर्की येथील आदिलशा सिकंदर तासेवाले वय २३, मूडलगी तालुक्यातील खानट्टी येथील महांतेश हणमंत होसुप्पार वय २२, नांगनूर येथील महालिंगप्पा भीमाप्पा कुरी वय ३० आणि सौंदत्ती येथील सुंदर शिवानंद बाळीकाई वय २३ या सहा आरोपींना गोकाक पोलिसांनी अटक केली आहे.

या सर्वांनी इलेक्ट्रॉनिक उपकरण वापरून केपीटीसीएसला कनिष्ठ सहाय्यक परीक्षा दिल्याची माहिती उपलब्ध झाली असून पोलिसांनी सर्व आरोपींकडून इलेक्ट्रॉनिक उपकरणे, मोबाईल फोन आणि महत्त्वाची कागदपत्रे जप्त करून पुढील तपास सुरू केला आहे.

Tags:

6-more-accused-are-arrested-in-the-illegal-case-of-kptcl-exam/