भरधाव दुचाकीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या कठड्याला धडकून दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ही दुर्घटना विजापूर जिल्ह्यातील मुद्देबिहाळ तालुक्यातील मलगलदिन्नीजवळ झाली.

मलगलदिन्नी येथील रहिवासी 25 वर्षीय हनुमंतप्पा सोमनाथ मलगलदिन्नीहून दुचाकीवरून मुद्देबिहाळ येथे जात असताना भरधाव वेगामुळे त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे दुचाकीची रस्त्याशेजारील कठड्याला जोरदार धडक बसली.
या अपघातात याचा जागीच मृत्यू झाला. मुद्देबिहाळ पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली आहे


Recent Comments