Belagavi

‘आमचे स्वप्न’ संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची आरोग्य तपासणी

Share

‘आमचे स्वप्न’ या समाजसेवा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसाठी विजया हॉस्पिटलमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले.

संस्थेच्या समाजसेवेची दखल घेत विजया हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी संस्थेच्या सर्व सदस्यांची मोफत आरोग्य तपासणी केली. यावेळी उपस्थित विजया हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ.रवी पाटील यांनी ‘आमचे स्वप्न’ संस्थेच्या सदस्यांना आरोग्य चांगले राहण्यासाठी आवश्यक ती सर्व माहिती दिली. तसेच संस्थेच्या भविष्यातील समाजसेवेबाबत त्यांनी काही सूचना केल्या. सर्वलोक सेवा फाउंडेशनचे संस्थापक वीरेश हिरेमठ आदी या वेळी उपस्थित होते.

Tags:

belagavi-health-camp/