Belagavi

खतीब-ए-आझम फाउंडेशनतर्फे आरोग्य तपासणी शिबीर

Share

खतीब-ए-आझम या फाउंडेशनच्या वतीने बेळगावमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

बेळगावमधील न्यू गांधी नगर येथे ईद-ए-मिलाद निमित्त रविवारी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उदघाटन नगरसेवक अझीम पटवेगार यांच्या हस्ते करण्यात आले.

या शिबिरात ५०० हुन अधिक नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. रक्तदाब, मधुमेह, थायरॉईड, दंतचिकित्सा यासह विविध आजारांची तपासणी करण्यात आली. या शिबिरासाठी मुफ्ती मंजूर अहमद, डॉ. विक्रांत गट्नहट्टी हे मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

यावेळी डॉ. सदरोद्दीन गदगवाले, डॉ. आसिफ मंगलहट्टी, डॉ. प्रमोद अनिगोळ आदींनी आरोग्य तपासणी केली. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी खतीब-ए-आझम फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Tags:

khatibe-azam-foundation-free-health-camp