बेळगावमधील शिवसृष्टीच्या उदघाटनाचा पुन्हा एकदा घाट घातला असून दक्षिण मतदार संघाचे आमदार अभय पाटील हे स्वतःच्या स्वार्थासाठी पुन्हा एकदा शिवसृष्टीचे उद्घाटन करत असल्याचा आरोप श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांनी केलाय.

शहापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाजवळ बांधलेली शिवसृष्टी आजतागायत शिवप्रेमींसाठी खुली करण्यात आली नसल्याने शिवप्रेमींतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे . लवकरात लवकर शिवसृष्टी खुली करण्यासंदर्भात श्रीराम सेना हिंदुस्थान संघटनेचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखाली आज तिसऱ्यांदा निवेदन सादर करण्यात आले आहे.
मनपा आणि बुडा यांच्या अनुदानातून मिळविलेल्या निधीतून शिवसृष्टी निर्माण करण्यात आली आहे. २०१३ मध्ये याचे कामकाज सुरु झाले. २०१७ मध्ये तत्कालीन पालकमंत्री रमेश जारकीहोळी, प्रकाश हुक्केरी, दिवंगत खासदार सुरेश अंगडी , माजी आमदार संजय पाटील, तत्कालीन जिल्हाधिकारी एन. जयराम यांच्या नेतृत्वाखाली या शिवसृष्टीचे उदघाटनाही करण्यात आले.
मात्र आजतागायत जनतेसाठी हि शिवसृष्टी खुली करण्यात आली नाही. यानंतर आणखी एकदा उदघाटन करण्यात आले. गेल्या महिन्यात श्रीराम सेना हिंदुस्थांच्यावतीने आंदोलन छेदून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. यानंतर पुन्हा एकदा शिवसृष्टीच्या उदघाटनाची तयारी होत असून यामुळे समस्त शिवप्रेमींच्या भावना दुखावत असल्याचे रमाकांत कोंडुसकर म्हणाले.
यावेळी सागर पाटील, नरेश निलजकर, बळवंत शिंदोळकर आदी उपस्थित होते.


Recent Comments