Belagavi

केएलईतर्फे कर्नाटक राज्य बालरोग तज्ज्ञ परिषद

Share

काहेरचा बालरोग विभाग, जेएन मेडिकल कॉलेज, बेळगाव आणि इंडियन अकादमी ऑफ पेडियाट्रिक्स, कर्नाटक राज्य, आयएपी मेडिको लीगल कर्नाटक गट, बीम्स बालरोग विभाग, आणि आयएपी बेळगाव जिल्हा शाखा यांच्या वतीने ’36 व्या दक्षिण झोन आणि आयएपी बेळगाव व कर्नाटक राज्य परिषद’ घेण्यात आली.

14 ते 16 ऑक्टोबर या काळात केएलई शताब्दी सभागृहात ही परिषद पार पडली.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आणि डॉ. प्रभाकर कोरे, माजी खासदार, कुलपती, काहेर आणि अध्यक्ष – केएलई सोसायटी बेळगाव, सन्माननीय अतिथी डॉ. रमेश कुमार. आर, इंडियन अकादमी ऑफ पेडियाट्रिक्सचे राष्ट्रीय अध्यक्ष, डॉ. उपेंद्र एस किंजवडेकर, डॉ. पीयूष गुप्ता, माजी अध्यक्ष डॉ. विनीत सक्सेना, मानद महासचिव डॉ. संतोष सोन्स,

माजी अध्यक्ष डॉ. व्ही. के. गोयल आदी उपस्थित होते. काहेरच्या कार्यवाहक कुलगुरू आणि प्राचार्य, जे.एन. वैद्यकीय महाविद्यालय एन.एस. महंतशेट्टी, आयोजक अध्यक्षा, अध्यक्ष कर्नाटक राज्य आणि बालरोग शास्त्र प्रा. डॉ. रूपा एम. बेल्लद यांनी पाहुण्यांचे, प्राध्यापकांचे आणि प्रतिनिधींचे स्वागत केले.

 


यावेळी महाराष्ट्राचे मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी, केएलई सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांची प्रशंसा केली. तसेच मुलांची निकोप वाढ आणि विकासाला चालना देण्यासाठी पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी बालरोग तज्ज्ञांची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले. त्यांनी डॉ. प्रभाकर कोरे यांच्या प्रयत्नांचे कौतुक करून केएलई सोसायटीने केवळ कर्नाटकातच नव्हे तर महाराष्ट्र आणि भारताच्या इतर भागांमध्ये आरोग्य आणि शिक्षणाचा प्रचार करण्यासाठी मोठे योगदान दिल्याचे सांगितले. ग्रामीण भागातील मुलांचा पोषण दर्जा सुधारण्यासाठी शासनाने घेतलेल्या उपक्रमांची माहितीही त्यांनी दिली. डॉ. प्रभाकर कोरे यांना त्यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त त्यांनी उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Tags: