Belagavi

वृत्तपत्र विक्रेत्यांचा बेळगावात सत्कार

Share

बेळगाव वृत्तपत्र विक्रेता वितरण दिनानिमित्त भाजप ओबीसी मोर्चा कर्नाटक राज्य सचिव व विमल फाउंडेशनचे अध्यक्ष किरण जाधव यांच्यावतीने टाइम्स ऑफ इंडिया आणि विजय कर्नाटक यांच्या संयुक्त विद्यमाने बेळगावातील वृत्तपत्र विक्रेत्यांचा सत्कार समारंभ किरण जाधव यांच्या न्यू गुड शेड रोड येथील संपर्क कार्यालयात पार पडला.
मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाणारे माजी राष्ट्रपती यांनी वयाच्या दहाव्या वर्षीपासून रामेश्वरम येथे फिरून वृत्तपत्रे विकून शिक्षण पूर्ण केले होते. त्यांचा जन्मदिन वृत्तपत्र विक्रेता दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्त बेळगावात आज वृत्तपत्र विक्रेत्यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमादरम्यान टाइम्स ऑफ इंडियाचे विशेष प्रतिनिधी आणि टाइम्स ऑफ इंडियाचे बेळगावचे वितरक दीपक जाधव, विजय कर्नाटकचे अविनाश नाईक, बेळगाव वृत्तपत्र विक्रेता असोसिएशनचे अध्यक्ष प्रताप भोसले, राजू भोसले, प्रकाश कुलकर्णी, सुभाष गोरे, मारिहाळ, एन. बी. कुलकर्णी, अशोक शिंदे, प्रशांत शहापूरकर, संजय कदम, प्रभू आदी उपस्थित होते.

Tags:

paper distributor satkar