शासनाने 19 रोजीच्या आत उसाला प्रति टन 3,500 रुपये भाव निश्चितीबाबत निर्णय न घेतल्यास 21 तारखेला सुवर्ण विधानसौध समोर उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा कर्नाटक राज्य रयत संघटना व हसीरु सेनेचे प्रदेशाध्यक्ष चुन्नप्पा पुजारी यांनी दिला.
बेळगावात रविवारी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना चुन्नप्पा पुजारी म्हणाले, बंगळुरू येथील विधानसौदा येथे साखर आयुक्त आणि साखर मंत्री यांच्या बैठकीत आम्ही अनेक मुद्दे मांडले. 3,500 प्रति टन उसाला भाव निश्चित करण्याचा आग्रह धरला असता मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. 19 तारखेपर्यंत योग्य दर निश्चित न केल्यास 21 रोजी सुवर्ण विधानसौधसमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.
यावेळी प्रकाश नायक, राजू मोरावे, राघवेंद्र नायका आदी उपस्थित होते.


Recent Comments