मंड्या जिल्ह्यातील के आर पेट तालुक्यातील अंबिगर या गावातील कावेरी, हेमवती आणि लक्ष्मणतीर्थ या नद्यांच्या संगमावर १३ ते १६ ऑक्टोबरपर्यंत मलेमहादेश्वर महाकुंभ मेळावा होणार असून या कुंभमेळ्यासाठी हुक्केरी हिरेमठाचे श्री चंद्रशेखर शिवाचार्य स्वामींना राज्य सरकारच्यावतीने मंत्री नारायणगौड यांनी आमंत्रित केले आहे.
या कुंभमेळ्यासाठी सुमारे ५ ते ६ लाख भाविकांची उपस्थिती असेल असा अंदाज वर्तविण्यात आला असून यासाठी १०० अतिरिक्त बसेसची सोय करण्यात आली असल्याचे नारायणगौड यांनी सांगितले.
हुक्केरी हिरेमठाचे श्री चंद्रशेखर शिवाचार्य स्वामी हे सीमावर्ती भागात कन्नड भाषेचे संवर्धन करत असून उत्तर कर्नाटकातील एक प्रभावशाली व्यक्तिमत्वाला आमंत्रित करताना आपल्याला अत्यानंद होत असल्याचे त्यांनी सांगितले.
सुत्तर जगद्गुरू शिवरात्रि देशिकेंद्राचे स्वामी, श्रीरंगपट्टणचे बेविमठाचे डॉ. त्रिनेत्र महंत शिवयोगी स्वामी, आदीचूंचनगिरी येथील निर्मलानंद स्वामी यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या कुंभ मेळ्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची प्रमुख उपस्थिती असेल. याचप्रमाणे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा, राज्यसभा सदस्य वीरेंद्र हेगडे, माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्यासह अनेक मान्यवर देखील उपस्थित राहणार आहेत.
आमंत्रण स्वीकारल्यानंतर बोलताना हुक्केरी हिरेमठाचे श्री चंद्रशेखर शिवाचार्य स्वामी बोलताना म्हणाले, आधी आपण उत्तर प्रदेश मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी जायचो मात्र आता आंबिगर गावात कुंभमेळा भारत असून याचा आपल्याला आनंद असल्याचे ते म्हणाले. अशाप्रकारचा कुंभमेळा उत्तर कर्नाटकात देखील आयोजित व्हावा, अशी इच्छा त्यांनी बोलून दाखविली
मंड्या जिल्ह्यातील त्रिवेणी संगमावर भरणाऱ्या कुंभमेळ्यासाठी सर्व तयारी करण्यात आली आहे. दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत होणाऱ्या या महाकुंभमेळ्यासाठी हुक्केरी हिरेमठाचे चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी देखील उपस्थित राहणार आहेत.


Recent Comments