Belagavi

बेळगावमध्ये राजा वीरमदकरी नायक जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक

Share

बेळगावमध्ये राजा वीर मदकरी जयंतीनिमित्त भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.

वीर मदकरी गर्जना संघाच्या वतीने बेळगावमध्ये राजा वीर मदकरी नायक जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. वीर मदकरी जयंतीनिमित्त श्री कपिलेश्वर देवस्थानापासून विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मिरवणुकीची सुरुवात झाली. आकर्षक पद्धतीने सजविलेल्या वाहनातून वीर मदकरी पुतळ्याची मिरवणूक काढण्यात आली. कपिलेश्वर मंदिरापासून सुरुवात झालेल्या मिरवणुकीची एसपीएम रोड, शहापूर-खडेबाजार यामार्गे फिरून दाणेगल्ली मार्केट येथे सांगता झाली. यावेळी राजा वीर मदकरी यांच्या नावाचा जयघोष करण्यात आला.

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना वाल्मिकी समाजाचे नेते भावकाण्णा बंग्यागोळ यांनी वीर मदकरी यांचा इतिहास सांगितला. वीर मदकरी गर्जना संघाच्या वतीने वीर मदकरी यांची जयंती आयोजित करताना आपल्याला अत्यानंद होत असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या सहा वर्षांपासून आनंद रामा शिरूर यांच्या नेतृत्वाखाली वीर मदकरी गर्जना संघाच्यावतीने अनेक सामाजिक उपक्रम राबविले जात असून यंदा भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आल्याचे ते म्हणाले.

यावेळी आनंद शिरूर, रामा हसनवर, दत्ता बिलावर, अडिवेप्पा, बलराम यांच्यासह नायक समाजातील विविध नेते, राजा वीर मदकरी नायक समर्थक उपस्थित होते.

Tags:

veermadakarinayak-jayanti-belgaum/